ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

कुठे गेली सरकार मधील मंत्र्यांची संवेदनशीलता? दिवाळी समेंलनात कमाल अटम डान्सची धमाल


परळी/ महाराष्ट्रात शेतकरी उपाशी मरतोय,एस टी कामगारांचा संप सुरू झाल्याने ग्रामीण भागातील जनतेची हालत खराब झालेली आहे .अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला मदत करून आपली जबाबदारी पार पाडयाची ऐवजी एका मंत्र्याने चक्क आपल्या मतदार संघात दिवाळी निमित्त स्नेह संमेलन आयोजित करून त्यात चक्क सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला आणि सपनाने एकापेक्षा एक अटम डान्स करून कार्यक्रमात धम्माल उडवून दिली . यावेळी श्रोत्यांची इतकी गर्दी झाली होती की त्यांना सोशल डिस्ट्चा विसर पडला होता
करोना अजूनही गेलेला नाही त्यामुळे साधेपणाने दिवाळी साजरी करा असे मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले होते पण त्यांच्याच मंत्री मंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मध्ये दिवाळी फराळ या नावाने एक स्नेह संमेलन आयोजित करून त्यात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला त्या मुळे या कार्यक्रमाला तुफान गर्दी लोटली .यावेळी सपनाने एकापेक्षा एक अटम डान्स सादर करून श्रोत्यांना खुश केले मात्र एकीकडे मंत्र्यांच्या या कार्यक्रमात दिवाळीचे रंग उधळले जात असताना दुसरीकडे मात्र अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या गरीब शेतकऱ्याला अजूनही मदत न मिळाल्याने त्याची दिवाळी अंधारात गेली त्यातच शनिवारी अहमद नगरच्या रुग्णालयात आग लागून ११ लोकांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्र दुखत होता एस टी कामगारांची दिवाळी दुखत गेली अशावेळी मंत्र्यांनी असे कार्यक्रम करणे योग्य आहे का असा सवाल संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय .

error: Content is protected !!