पालिकेच्या २३६ प्रभाग फेर रचनेचा मसुदा आठवडाभरात निवडणूक आयोगाला पाठवणार
मुंबई/ लोकसंख्या वाढीच्या ताजा आकडेवारीनुसार मुंबईत जे नवे वार्ड तयार करण्यात आलेत त्याबाबतचा अध्यादेश सरकारकडून पालिकेला मिळाला आहे .त्यानंतर पालिकेच्या वाढलेल्या ९ वार्ड सह सर्व २३६ वर्डच्या फेर रचनेचा मसुदा तयार करण्यात आला असून तो आठवडाभरात निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे .त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येईल तसेच आरक्षणाबाबत ची प्रक्रिया निवडणूक आयोगाला लवकर पूर्ण करता येईल कारण पुढील वर्षीच्या मार्च मध्ये मुंबई सह १८ महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे