राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे
मुंबई/ पी जी ,नीट च्या मुद्द्यावरून गेल्या २७ तारखेपासून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला होता त्याला डॉक्टरांची अधिकृत संघटना असलेल्या मार्ड ने पाठींबा देऊन सोमवारपासून मार्डचे डॉकटर ही या संपात उतरले होते मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पी जी नीट बाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल तसेच पिजी नीट कोनसलीग ची प्रक्रिया अधिक वेगाने राज्यात सुरु केली जाईल असे आश्वासन दिल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला मुंबईत कोरोंनाचे संकट असताना अशा तऱ्हेने डॉक्टरांचा संप सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिघडेल याची सरकारला कल्पना होती म्हणूनच हा संप मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले