महाराष्ट्राच्या विरोधात कानडी गुंडांचा भर रस्त्यात हैदोस- टोल नाक्यावर महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड
बेळगाव – महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आज कर्नाटकातील कन्नड वेदिकेच्या कांही गुंडानी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या १० वाहनावर हल्ला करून या वाहनांची तोडफोड केली तसेच महाराष्ट्र विरोधी घोषणा दिले .कांही गुंड पोलिसांनाही जुमानत नव्हते त्यांनी पोलिसांच्या गाडी वर चालून हैदोस घातला दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले . हे सर्व ४८ तासात थांबवा अन्यथा मला बेळगावमध्ये जावे लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे तर संभाजी राजे यांनीही बेळगावात जाण्याचा इशारा दिला आहे . दरम्यान दोन्ही कडची स्फोटक परिस्थिती पाहता कर्नाटक – महाराष्ट्र बस सेवा बंद करण्यात आली आहे
मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा चर्चेत आलेला असतानाच आज बेळगावजवळ महाराष्ट्रातील नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद पुण्याबरोबरच राज्यातील अन्य शहरांमध्येही उमटण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला हे हल्ले थांबवण्यासाठी २४ तासांचं अल्टीमेट दिलं आहे. या प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन घडलेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे. अशातच आता थेट संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. याच हल्ल्यानंतर ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळ धरणे आंदोलन करुन वाहतूक अडवण्याचाही प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तरीही या ठिकाणी कार्यकर्त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने बराच वेळ पिवळ्या आणि लाल रंगाचे झेंडे फडकवत ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’चे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांचे नुकसान झाले आहे