ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बांगला देशात भारतीय टीव्हीचॅनलवर बंदी घालणार ?

ढाका- बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
बागलादेशी संस्कृती आणि समाजावर भारतीय प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतची याचिका वकील इखलास उद्दीन भुईयाँ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच याचिकेत केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन अॅक्ट २००६ अंतर्गत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणा देखील यामध्ये करण्यात आली आहे. तसेच माहिती प्रसारण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे सचिव आणि बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग आणि इतरांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती सांगितली जात आहे. या अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकदर महमुदूर रझी यांच्या खंडपीठात होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!