महापालिका निवडणुकांचे वेध मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
मुंबई/विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे मुंबईसह 16 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणे बाकी आहे त्यामुळे मुंबईमध्ये मनसेची असलेली ताकद लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत ठेवण्याचे संकेत दिले आहेत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आमच्या महायुतीत अगोदरच तीन पक्ष असल्यामुळे मनसेचा समावेश करून घेता आला नाही त्यामुळे मनसेने स्वबळावर निवडणुका लढवल्या परंतु स्वबळावर निवडणुका लढवून ही त्यांनी प्रत्येक मतदारसंघात चांगली मते मिळवली याचा अर्थ मनसेची चांगली ताकद आहे आणि म्हणूनच महापालिका निवडणुकीत त्यांना बरोबर घेण्याचा आम्ही विचार करीत आहोत आम्हाला त्यात रस आहे काय मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीत मनसेही सामील होणार असे संकेत मिळत आहेत