टाकवे हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
टाकवे- शिराळा तालुक्यातील टाकवे हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आर. सी. पाटील व ग्रामविकास मुंबई मंडळाचे सदस्य शंकर बोबडे यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक खाडे यांनी स्वागत केले तर रमेश सावंत यांनी प्रास्ताविक केले .यावेळी पंच म्हणून इमतियाज नाईक, सुनील काळे यांनी काम पाहिले. बी. बी. पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले

