राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी; सोमवारपासून कठोर निर्बंध
मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी असेल.तसेच उद्याने ,खेळाची मैदाने,प्राणिसंग्रहालय,जिम,स्विमिंग पूल बंद राहतील राजकीय आणि सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल लग्न समारंभास ५० तर अंत्य विधीस फक्त २० माणसांना परवानगी असेल रेस्टॉरंट,हॉटेल्स,सलून,आदींना फक्त ५० टक्के ग्राहकांची मर्यादा असेल आणि ८ वाजेपर्यंतच या सर्वांना परवानगी राहील सार्वजनिक वाहतुकीत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा असेल तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक असेल मात्र लोकल ट्रेन प्रवासाबद्दल पूर्वी होते तेच नियम असतील अशा प्रकारची नियमावली जरी करण्यात आलीय.