ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराष्ट्राचा भूगोल बदलतोय – बेसावध राहू नका- राज ठाकरे


पुणे – मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आज पुण्यात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या जमिनी विकणाऱ्या मराठी माणसांना सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले शिवडी न्हावा शेवा पूल होत आहे. त्यामुळे भलेही मुंबई – अलिबाग मधील अंतर कमी झालेले असले तरी धोका रायगडला त्याचा मोठा धोका वाढलाय . कारण पूर्वी जेंव्हा जेंव्हा असे प्रकल्प झाले तेंव्हा तेंव्हा इथल्या जमिनी गेल्या . मुंबई – रायगडमधले अंतर कमी झाल्याने इथे येणाऱ्यांचे लोंढे वाढणार आहेत. आणि त्यासाठी इथल्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या जातील. महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे, जमीन तुम्हाला कळत नाही इतक्या चलाखीनं विकत घेतली जातेय. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व, तेच जर तुमच्याकडून निघून गेलं. जातीपातीत इतर गोष्टीत इतकं मश्गूल झालो की आपलं स्वत:चं काय ते विसरुन गेलो. सातव्या शतकात जन्माला आलेली मराठी आपण घालवून बसतोय, असं राज ठाकरे म्हणा मराठ्यांचा इतिहास नाटक ते अटक असा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील आपला मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे. टीव्हीवरील मालिका आणि मोबाइलवरील रिल्स यात तो इतका अडकलेला आहे. मराठी माणसाला इतिहास आहे, मराठी माणूस राज्यकर्ता होता. आपण या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो. इतका मोठा इतिहास असून आपण सगळं विसरत चाललोय.एकमेकांमध्ये भांडत बसलोय, असं राज ठाकरेंनी म्हटलंले. यावेळी मराठी कलावंत एकमेकांना वेड्या वाकड्या नावाने हाक मारतात एकमेकांचा सन्मान करीत नाहीत याबाबतही त्यांनी मराठा कलाकारांचे कांन टोचले

error: Content is protected !!