आठवड्यातून ३ दिवस मंत्रालयात थांबा – मुख्यमंत्र्यांचे सर्व खात्याच्या मंत्र्यांना आदेश
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्यानुसार आठवड्यातून किमान ३ दिवस तरी मंत्र्यांनी मंत्रालयात थांबावे असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबणे आणि मंत्रालयात येणाऱ्या लोकांची कामे करणे बंधनकारक असेल
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सर्व मंत्री आज मुंबईत मंत्रालयात आले होते. प्रत्येक मंत्री हे त्यांच्या खात्याचे मंत्री असले तरी ते त्यांच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी देखील आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाचीदेखील कामे करणं अनिवार्य आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून आपल्या मतदारसंघांचा विकासासह राज्यातील विकासकामांकडेही लक्ष द्यावं लागतं. मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे मंत्र्यांनी जास्त काम करणं हे साहजिकच अपेक्षित असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे याच भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत.