ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलचा शुभारंभ – गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार

नवी दिल्ली – देशातील सीबीआयने इंटरपोलच्या धर्तीवर सुरु केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या ‘भारतपोल’ पोर्टलमुळे राज्य पोलीस दले आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीना इंटरपोलच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा इंटरपोलशी संबंधित प्रकरणांना जबाबदार राहणार आहे.
सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन कट्टरता, संघटीत गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करी यांच्यासह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची वाढती संख्येमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने आणि वास्तविक वेळेत होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यांसाठी या प्रकारच्या पोर्टलची आवश्यकता होती. या वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सीबीआयने हे भारतपोर्टल विकसित केले आङे. याच्या अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली असून ती अतिशय सुलभ आहे. ही वेबसाईट सर्व तपास यंत्रणांना एकत्र व्यासपीठ मिळवून देणार आहे.
भारतात इंटरपोलसाठी राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या ( एनसीबी-नवी दिल्ली ) रुपात सीबीआय,इतर कायदे अंमलबजावणी एजन्सींसह देशभरातील विभिन्न एजन्सींचा एकत्र मिळून गुन्ह्यांच्या प्रकरणांत आंतरराष्ट्रीय मदतीची सुविधा प्रदान करणार आहे. भारतपोल लाँच झाल्यानंतर देशातील सर्व पोलिस यंत्रणा आणि तपास एजन्सींना त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. भारतपोल हे पोर्टल देशाला इन्व्हेस्टीगेशनच्या नव्या युगात घेऊन जाईल असे भारतपोल पोर्टल लाँच करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!