ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू एफ – नॉर्थ प्रभागात तीनशे किलोचा साठा जप्त

मुंबई/प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांना बंदी घातली होती तरीसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू विकल्या जातात .त्यामुळे या बेकायदा प्लास्टिक विक्रीला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने प्लास्टिक विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.               

   पालिका एफ नॉर्थ प्रभागाच्या अनुज्ञापन विभागाने माटुंगा येथे कारवाई करून तीनशे किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केलेल्या आहे. या कारवाईत लायसन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक गणेश मुंदळे यांच्या पथकाने भाग घेतला होता या कारवाईत परवाना निरीक्षक संजय खोले , श्रीमती. वर्षा बोऱ्हाडे ,  गजेंद्र चौहान यांनी भाग घेतला तर एपीआय  दीपक फुलणे, वाहतूक पोलीस पीएसआय रामचंद्र लोखंडे यांचा सहभाग होता. या कारवाईत चार रास्ता माटुंगा येथे  प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आणि प्लास्टिक मालकास दंड ठोठावण्यात आला .
                  प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात बऱ्यापैकी यश आलेले आहे अशीच कारवाई पालिकेच्या संपूर्ण 24 वार्डांमध्ये व्हायला हवी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत.

error: Content is protected !!