नवे तीन साहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिकेत
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेत पदभरती आणि पदोन्नती रखडल्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांना प्रभारी म्हणून कार्यभार सोपवला गेला होता. त्यामुळे त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवे तीन सहाय्यक आयुक्त यांच्या नेमणुका करून जनतेला दिलासा दिला आहे
पालिकेत पी उत्तर विभागात कुंदन वळवी, एफ उत्तर विभागात नितीन शुक्ला तर बी विभागात शंकर भोसले यांची साहाय्यक आयुक्तपदावर नेमणूक केली आहे.
साहाय्यक आयुक्तपदासह अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या उपायुक्त किरण दिघावकर, संतोषकुमार धोंडे आणि पृथ्वीराज चौहाण यांची साहाय्यक आयुक्तपदावरून मुक्तता झाली आहे.
