शिवसेना नेत्यांवर पुन्हा आयकर विभागाचे छापे
मुंबई/ स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरात आयकर विभागाला मोठे घबाड सापडल्या नंतर आयकर विभागाने शिवसेना नेत्यां विरुद्ध ची मोहीम आणखी तेज केली असून काल आणखी काही शिवसेना नेत्यांवर धाडी टाकण्यात आल्या यावेळी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना टार्गेट करण्यात आले आहे
काल आयकर विभागाने सकाळपासूनच धाडसत्र सुरू केले .यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे पदाधिकारी असलेले शिर्डी देवस्थानचे विश्वस्त नगरसेवक राहुल कानाल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला त्यांच्याकडे मोठे घबाड सापडल्याची चर्चा आहे त्यानंतर रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्याही घरावर आयकर विभागाने धाड टाकली तसेच भ्रष्ट आर टी ओ अधिकारी बजरंग खरमाते यांच्या घरावरही लाच घेतल्याच्या प्रकरणी आयकर विभागाने छापा टाकला तसेच पुढील काळात आणखी काही शिवसेना नेत्यांवर धाडी टाकल्या जाण्याची शक्यता आहे शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का आहे कारण आयकर खात्याच्या धाडीत जर 100 कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडली तर या प्रकरणात ई डी ची एंट्री होईल आणि आणखी मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल त्यामुळे शिवसेना नेते चांगलेच धास्तावले आहेत
लीड
बॉक्स साठी मोठी जागा ठेवणे संजय राऊत ही पत्रकार परिषद घेणार आहे त्यातील महत्वाचा मुद्दा बॉक्स मध्ये घ्यायचा आहे