सर्व संपकरी कामगारांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे न्यायालयाचे आदेश
एस टी कामगारांचा संप अखेर मिटला?
मुंबई/ विलीनीकरण मागणीसाठी गेल्या साडेचार महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कामगारांचा संप अखेर मिटला कारण न्यायालयाने एस टी कामगारांना निवृत्ती वेतन आणि ग्रेज्यूटी देण्याचे सरकारला आदेश दिले आहेत तसेच एस टी कामगारांनी 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हावे असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत आणि न्यायालयाचा हा आदेश एस टी कामगारांनी मान्य केला असल्याचे समजते .
एस टी कामगारांच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती .या सुनावणी दरम्यान विलगीकरण बाबतीत त्रिसदस्यीय समितीने दिलेले अहवाल आणि त्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय करण्यात आला त्यावर गेले दोन दिवस सुनावणी सुरू होती बुधवारी न्यायालयाने एस टी कामगारांना 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हायला सांगितले होते . तर आज न्यायलयाने राज्य सरकारला सांगितले की एस टी कामगारांना निवृत्ती वेतन आणि ग्र्याज्युटी द्या तसेच त्यांच्यावरची कारवाई मागे घेऊन त्यानारुजू करून घ्या यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांनीही चांगलेच झापले आहे .कामगरांची दिशाभूल करू नका अशी यांनीच सदावर्ते याना न्यायालयाने दिली आहे . दरम्यान यावेळी न्यायालयाचा आदर्श संपकरी कामगार मंनार असल्याचे समजते त्यामुळे आता हा संप मिटलेला आहे.22 तारखेपासून न्यायालयाच्या आदेशानुसार कामगार कामावर रुजू होतील अशा तऱ्हेने साडेचार महिन्यांच्या नंतर संप मिटला आहे .