ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

बी विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गायकवाड़ एसीबीच्या जाळ्यात

ब : मुंबई महानगर पालिकेच्या बी विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गायकवाड़ यांना लाचलूचपत प्रतिबंध विरोधी कक्षाच्या पथकाने बुधवार ता.6 रोजी बी विभाग कार्यालयातून ताब्यात घेतले.
अटकेत असलेले डॉ.संदिप रविंद्र गायकवाड हे मागील तीन वर्षापासून बी विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

या संदर्भातील हकीकत अशी
तक्रारदार हॉटेल व्यवसायिक असुन सदर हॉटेल सन 2018 साली फिर्यादी यांनी विकत घेतले होते.फिर्यादी यांना जुन्या मालकाच्या नावावर असलेले आरोग्य परवाना (हेल्थ लायसन्स) स्वतःच्या नावावर हस्तांतरीत करणे,हॉटेलचे डिझेल इंधन आधारीत भट्टीचे एल.पी.जी.मध्ये रुपांतर करणे,पत्त्यामध्ये पिन कोड दुरुस्त करणे या कामाकरीता ‘बी’ वॉर्ड येथे अर्ज केला होता.सदर कामासाठी फिर्यादी यांचेकडे डॉ.संदिप गायकवाड यांनी 50 हजार रुपये लाच मागितली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचे काम करण्याकरीता तक्रार देण्यापूर्वीच डॉ. संदिप गायकवाड यांना 40हजार रुपये  दिले होते.त्यानंतरही सदरहू कामाकरीता अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्राकरीता अग्निशमन दलास पत्रव्यवहार करण्याकरीता तसेच पिन कोड दुरुस्तीकरीता आणखी 3 हजार रूपयांची मागणी केली.तक्रारदार यांची लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी वरळी येथील लाचलूचपत कार्यालयात लेखी तक्रार केली.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ता.6 रोजी बी विभाग येथे करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान डॉ.संदिप गायकवाड यांनी 3 हजार रुपये रक्कमेच्या लाचेची मागणी करुन ओळखीच्या असलेल्या सचिन कोकितकर यांच्याकडे सदर प्रलंबित काम पुर्ण करण्याकरीता पैसे देण्यास सांगितले.त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा रचून  सचिन कोकितकर यांना 3 हजार रुपये रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले.तदनंतर बी विभागातून डॉ.संदीप गायकवाड़ यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.सदर कार्रवाई मुळे बी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!