ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात – मुलगी रोहिणी मात्र राष्ट्रवादीतच

जळगाव – एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. तर दुसरीकडे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.
भा जपकडून रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शरद पवार गटाकडून अद्याप रक्षा खडसे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. रक्षा खडसे यांच्या विरोधात रावेर मध्ये तोडीस तोड उमेदवार शोधण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवरच रोहिणी खडसे शरद पवारांची भेट घेणार आहेत.
उद्या पुण्यात रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच रोहिणी खडसे यांची पुण्यात पत्रकार परिषद देखील होणार आहे.
रावेर मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासह जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित असतील. रावेरमधून नेमकं शरद पवार कुणाला मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच पत्रकार परिषदेत रोहिणी खडसे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी येत्या १५ दिवसात भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. भाजप हे माझे घर आहे. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये होतो. काही नाराजीमुळे मी बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाली. म्हणून मी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करत आहे. शरद पवार यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती पाहता मी जयंत पाटील यांना सांगितली आहे. त्यांची अनुकूलता पाहून भाजपमधे जाण्याचा मी निर्णय घेतल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!