ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच



मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .
सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या काल त्यांना डिस्चार्ज मिळाला पण सूभ जळला तरी पीळ कायम असतो या म्हणी प्रमाणे 12 दिवस तुरुंगात राहूनही त्यांची मुजोरी कमी झाली नाही इतकेच नव्हे तर न्यायालयाने जमीन देताना ज्या अटी घातल्या होत्या त्याचाही त्यांना विसर पडला . त्यांनी रुग्णालयातून बाहेर येताच थेट मुख्यमंत्र्यांना आपल्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे तेही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदार संघातून! हा मूर्खपणाचा कळस म्हणावे लागेल.अर्थात त्यांच्या या बालिशपणा ची संपूर्ण महाराष्ट्र थट्टा उडवतो आहे .पण त्यांना त्याचे काहीच वाटत नाही मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मीडिया समोर बोलू नये ही जी अट घातली होती . त्या अटीचा भंग केल्याने आता न्यायालयाने राणा दांप्त्यावर कारवाई करावी त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली जात आहे

error: Content is protected !!