ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

जनतेचे मरण त्यांचे राजकारण

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महावविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे ती पाहिल्यावर या लोकांच्या विषयी सामान्य माणसाच्या मनात जो संताप निर्माण झालाय . त्याचा आगामी निवडणुकीत स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही . कारण जेवढा वेळ हे लोक सहावी जागा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात घालवीत आहेत . तेवढंच वेळ जर यांनी लोकांच्या प्रश्नासाठी दिला असता तर आज घोटभर पाण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातील माता भगिनीवर विहिरीत उतरण्याची पाळी आली नसती . नदी नाल्यांवर पूल नसल्याने कमर भर पाण्यातून आमच्या मुलाबलांवर शाळेत जाण्याची पाळी आली नसती .राज्यसभेची एक जागा आणि त्यावर घिरट्या घालणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार हे सगळ चित्र भयानक आहे लोकांचे प्रश्न बाजूला ठेऊन केवळ राजकारणासाठी जर लोकप्रतिनिधी इतका वेळ देत असतील तर लोकांनी काय करावे राजसभा निवडणुकीत आपले आमदार पुरू नयेत म्हणून महाविकास आघाडी आणि भाजप वाल्यांनी सुधा आपल्या सर्व आमदारांना पंचतारांकित हॉटेलात सुरक्षित ठेवले आहे.आता निवडणुकीपर्यंत म्हणजे 10 जूनपर्यंत त्यांना पक्षीय बंदिवासात राहावे लागणार पण या काळात त्यांच्या मतदार संघातील लोकांचे काय? तिथल्या एखाद्या माणसाला वैद्यकीय सेवेसाठी किंवा नोकरी जर आमदाराच्या शिफारस पत्राची गरज लागली तर त्याने काय करावे? आमदारांचा अशाप्रकारे जनसंपर्क तोडून त्यांना मतदार संघातील लोकांपासून चार पाच दिवस दूर ठेवणे योग्य आहे का ? याचे उत्तर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे,शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे राज्य सभेचे मतदान हे उघडपणे होणार आहे त्यामुळे काही लपून राहणार नाही मग आमदारांना एकत्र ठेवण्याचे करणाच काय जर आमदारांची खरेदी विक्री यापूर्वीच झाली असेल आणि त्या आमदाराने आपल्या एका मताच्या बदल्यात ज्याला मत द्यायचे आहे त्याच्याकडून पैसे घेतले असतील तर अशा आमदारांना एकत्र ठेवले काय किंवा मोकळे ठेवले काय ते त्यांच्या मर्जी प्रमाणेच मतदान करणार

आणि हे ठाऊक असतानाही आमदार फीरू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्याचा खटाटोप सुरू आहे.इथे एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करायची आहे टी म्हणजे राजसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीला मोठ्या पक्षांना छोट्या पक्षाची आठवण येते इतर वेळी त्यांना कोण विचारात नाही त्यांच्या मतदार संघा मधली कामे केली जात नाहीत त्यांना पुरेसा विकास निधी दिला जात नाही त्यामुळे मग निवडणुकीच्या वेळी हे छोटे पक्ष ताणून धरतात मतांच्या बदल्यात मोठा डिमांड करतात यात त्यांची काहीच चूक नाही सध्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही तसेच झाले आहे सपा,शेतकरी कामगार पक्ष,एम आय एम आणि बहुजन विकास आघाडी यांनीही तसेच केले आहे राज्यसभा निवडणुकीत आघाडीला मतदान करण्याचा मोबदल्यात त्यांनी ज्या अटी घातल्या आहेत त्या योग्यच आहेत.कारण शेवटी प्रत्येकाची कधीना कधी वेळ येतेच! गेली adeej वर्ष महा विकास आघाडीची सत्ता आहे पण मुस्लिमांच्या प्रश्नांकडे त्यांनी कधीही लक्ष दिलेले नाही तोच प्रकार बहुजन विकास आघाडीच्या बाबतीत आहे वसई विरार मधील काही प्रकल्प निधी अभावी रखडले ते पूर्ण करण्यासाठी आघाडी सरकारने पुरेशी मदत केली नाही मग आता त्यांच्याकडे तुम्ही कुठल्या तोंडाने मदत मागत आहात? हे सर्व पाहता राज्यसभेसाठी किती जरी मोर्चे बांधणी केली तरी शेवटी जे व्हायचे ते होणारच आहे

error: Content is protected !!