मोबाईल मधले किलर गेम
मोबाईल ही सध्या माणसासाठी जीवनावश्यक वस्तू बनली आहे.मात्र या मोबाईलचा जर चांगल्या कामासाठी वापर केला तर माणसाला आर्थिक लाभ आणि सार्वजनिक क्षेत्रात एक नवी ओळख मिळू शकते पण त्याचा दुरुपयोग केला तर मात्र माणसाचे आयुष्य बरबाद होऊ शकते त्यामुळे मोबाईल मधील वाईट गोष्टींपासून माणसाने नेहमीच दूर राहायला हवे खास करून मोबाईल मध्ये माहितीच्या मायाजलाच्या अंतर्गत पोनोग्रफी आणि पब्जी किंवा लुडो गेम सारख्या ज्या हानिकारक गोष्टी आहेत . त्या माणसाला विनाशाकडे नेतात.काही लोक सुरुवातीला एक टाईम पास म्हणून या गेमकडे पाहतात पण नंतर मात्र ते एक भयंकर व्यसन बनते आणि हे व्यसन दारू आणि अमली पदार्थांच्या व्यसणापेक्षा भयंकर असते नुकतेच पपजी गेमच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने आपल्या जन्मदात्या मातेची हत्या केली तर दुसरीकडे लूडो गेम मध्ये हरल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली .काही गेम इतके भयंकर असतात की त्या गेम मध्ये सूचना दिल्या प्रमाणे माणूस वागतो त्यात जर एखाद्या माणसाचा खून करण्याची सूचना आली असेल तर हा गेम खेळणारा माणूस समोरच्याची हत्या करायला सुधा मागे पुढे पाहत नाही .त्या गेम मध्ये तुम्ही तुमचे जीवन संपवा अशी जर सूचना असेल तर माणूस आत्महत्या सुधा करतो असे अनेक वेळा घडले आहे . त्यामुळे भारत सरकारने अशा गेमवर बंदी घातली होती मात्र तरीही मोबाईलवर अजूनही पबजी सारखे गेम आहेत आणि या गेममध्ये माणूस एकदा घुसला की त्याला अन्नपानी काम धंदा कशाचीही आठवण राहत नाही .गेम सगळ्यात भयंकर म्हणजे गेम खेळताना अशा माणसाला कोणी डिस्टर्ब केला तर तो त्याचा जीव घ्यायला सुधा मागे पुढे पाहत नाही इतके या गेमचे भयंकर व्यसन आहे .
काही दिवसांपूर्वी एका तरुणाने मोबाईल जमच्या आहारी जाऊन आई वडिलांची हत्या केली होती तर दोन दिवसांपूर्वी एकाने आईची हत्या केली .काय चाललंय हे सर्व? मोबाईल गेम जर इतके हानिकारक थाटात असतील तर केंद्र सरकारं त्याबाबत कायदा का करत नाही .ज्या प्रमाणे नेट वरून सरकारने काही अश्लील साईट हरवल्या त्या प्रमाणे पबजी सारखे गेम का हटवली जात नाहीत .आज या पपजी लोकांना खास करून शाळा कॉलेज मधल्या मुलांना इतके वेड लावले आहे की अभ्यास सोडून मुले मोबाईल मध्ये ऑन लाईन हा गेम खेळताना दिसतात अशावेळी त्यांना मध्येच कुणी अडवले किंवा डिस्टर्ब केला तर त्यांना भयंकर राग येतो . या रागाच्या भरात ते एखाद्याचा खूनही करतात किंवा स्वतः तरी गळफास घेऊन आत्महत्या करतात तेंव्हा हे कुठेतरी थांबायला हवे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा किंवा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन या गेमच्य विरोधात रस्त्यावर उतरेल हवे कारण या गेम मध्ये अडकलेली तुमची आमची मुले उद्या गुन्हेगार बनतील आणि त्यांचे आयुष्य बरबाद होईल . आजची तरुण पिढी ही या देशाचे भवितव्य आहे त्यांना व्यसनाधीन होण्यापासून रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही तर संपूर्ण समाजाची आहे म्हणूनच आता समाजाने या विरुद्ध आवाज उठवायला हवा .