ऑनलाईन धर्मांतराचे महाराष्ट्र कनेक्शन
मुंबई – मोबाईल ऍप च्या माध्यमातून धर्मांतर करण्याच्या प्रकरणाची आता चौकशी सुरु झालेली असतानाच या चौकशीत आता धर्मांतराचे कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे उघडकीस आले आहे.
ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील मुंब्य्रात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचं आरोपीने जबाबात सांगितलेय. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. ऑनलाईन गेमिंगचा वापर करुन ब्रेन वॉश करत धर्मांतर केले जात असल्याचे समोर आलेय, असे डीसीपी अग्रवाल यांनी सांगितलेय.
गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन आहे. कारण यातील एक आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचं समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहनवाज खान 31 मे पासूनच फरार आहे…त्याआधी त्याने त्याच्या कुटुंबियांना सोलापूरला शिफ्ट केलं. तर 1 जूनला गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क करुन त्यांची मदत मागितली..पण तोपर्यंत उशीर झाला होता. केरला स्टोरीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करुन त्यांचं धर्मांतर कसं केलं जातं हे दाखवलंय. पण धर्मांतराच्या याच पॅटर्नमध्ये बदल करुन मोबाईल गेम खेळणाऱ्यांना आता टार्गेट केलं जातंय. त्यात एकट्या मुंब्र्यातून 400 जणांचं धर्मांतर झालं असेल तर नक्कीच चिंतेची बाब आहे.