ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार


नवी दिल्ली/एनडीए सरकारचा तिसरा कार्यकाल 9 जून पासून सुरू होण्याची शक्यता आहे कारण नऊ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे यंदाच्या निवडणुकीत एनडीए आघाडीला भलेही 300 चा आकडा गाथा आलेला नसला तरी पलटू राम अशी ओळख असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर आणि पाठिंब्यावर मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येत आहे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 242 जागा मिळाल्या होत्या तर एनडीए आघाडीला 296 विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे दोन्हीकडून खासदारांची खेचाखेची सुरू झाली होती परंतु नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी ऐन वेळा काही अटींवर मोदी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे राष्ट्रपती द्रोपदी भुरमू यांनी सर्वात मोठी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले आहे त्यानुसार मोदी 9 तारखेला आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा प्रारंभ करतील त्यांच्यासोबत नऊ जूनला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे काही नेते मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे
दरम्यान निकाल लागल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांपासून सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्या वेगवेगळ्या बैठका सुरू होत्या या बैठकीत इंडिया आघाडी देखील सत्तेसाठी प्रयत्नशील होती पण त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्याला सरकार बनवण्यात अपयश आलं या उलट नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भरोशावर मोदी तिसऱ्यांदा सरकार बनवत आहेत आज जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी एचडी सर्व घटक पैशांची बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान एकनाथ शिंदे अजित दादा पवार आधी घटक पक्षांचे सगळे नेते उपस्थित होते त्यामुळे एनडीए आघाडी सरकार पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे पण यावेळी मात्र त्यांना 2019 आणि 2014 एवढी सक्षम ताकद नसेल त्यामुळे हे सरकार स्थिर असेल की नाही याची कोणतीही गॅरंटी नाही मात्र काही का असेना मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा विक्रम करून विरोधकांना चितपट केले आहे

error: Content is protected !!