ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अंधेरीतील कामगार रुग्णालय लवकरच सुरु होणार

मुंबई – अंधेरीतील कामगार रुग्णालय पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून रुग्णालयातील ओपीडी सुरु होईल असे सांगण्यात आले आले .
कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ ला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि १५० जण जखमी झाले. आग लागण्यापूर्वी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या रुग्णालयात ओपीडी, ३५० बेड्स,आयसीयू आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते.
ओपीडी विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या.केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी रुग्णालय सुरू होण्यासाठी जातीने लक्ष घातले. रुग्णालयाचे काम सुरू करण्यासाठी नॅशनल बिल्डिंग्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) सोबत आढावा बैठका घेतल्या. या विषयावर चर्चा करण्यासाठी अलीकडेच महासंचालक ईएसआयसी आणि एनबीसीसीचे संचालक यांची बैठक झाली.
त्यानंतर ओपीडीचे काम तीन महिन्यांत पूर्ण केले आहे. औपीडी सुरू होणार असल्याने कामगारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी दिली.या रुग्णालयाच्या इमारतिच्या ‘ए’ आणि ‘ई’ विंगच्या तळापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ओपीडीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पीजी रुग्णालय आणि कर्मचारी निवासमधील ही काही दुरुस्ती करण्यात आले आहे. तसेच ओटी ब्लॉक ,बेसमेंट व तळमजला पासून पाचव्या मजला आणि आयपीडी ब्लॉक बेसमेंट व तळमजला पासून सातवा मजलाचे स्ट्रक्चरचे काम झाले आहे.

error: Content is protected !!