राहुल गांधींची शिक्षा कायम
अहमदाबाद/ सगळेच मोदी चोर कसे असे विधान करणाऱ्या राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत
२०१९ च्या निवडणुकीत मोदी आडनाव असलेल्यांचे विरोधात वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी गुजरात मधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सुरतच्या सत्र न्यायालयात झाली आणि न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी सुधा रद्द झाली त्याला राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते पण गुजरात न्यायालयानेही राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवली.