बड्या बापाच्या आणखी एका बेवड्या कारट्याने वरळीत गरीब कोळी दांपत्याला चिरडले
मुंबई – पुण्यातील पोर्शे कार अपघातात बड्या बापाच्या बेवड्या मुलाने दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच . वरळीत शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांच्या बेवड्या दिवट्याने सकूटर वरून जाणाऱ्या गरीब कोळी दांपत्याला चिरडले यात महिलेचा मृत्यू झाला तर आरोपी बेवडा फरार आहे. मात्र पार्टीचा नेता असलेल्या राजेश शहा आणि त्याच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. आता बड्या बापाच्या या बेवड्या आणि गर्दुल्ल्या पोरांना शिक्षा होण्यासारखा कायदा कधी करणार असा सवाल लोक विचारत आहेत
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशाच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं.