ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बांगला देश मध्ये २७ जिल्ह्यांमधील हिंदूंची गावे घरे जाळली

ढाका – बांगला देशात जातीयवादी संघटनेकडून सुरु असलेले हिंसक आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. मुस्लिम आंदोलक बांगला देशातील २७ जिल्ह्यनमढील हिंदूंची मंदिरे , घरे आणि मालमत्तानं टार्गेट करीत आहेत. आज तर ढाक्यात एका गर्भवती महिलेला घरात घुसून मारण्यात आले ती बेशुद्ध पडली पण ती मेली असे समजून तिला सोडले . दरम्यान भारत सरकारकडून या घटनेबद्दल केवळ चिंता व्यक्त केली जात आहे पण तिथल्या हिंदूंना वाचवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत तेंव्हा तिथले लाखो हिंदू राम भरोसे आहेत
पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बांगलादेशमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलकांकडून आता बांगलादेशमधील हिंदूंनादेखील लक्ष्य करण्यात येत आहे. आंदोलकांनी बांगलादेशमधील प्रसिद्ध हिंदू गायक राहुल आनंद यांच्या १४० वर्ष जून्याघराचंदेखील नुकसान केलं आहे.
एका वृत्तानुसार, आक्रमक आंदोलकांनी मंगळवारी गायक राहुल आनंद यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे आंदोलकांनी हल्ला केला त्यावेळी राहुल आनंद हे त्यांच्या परिवारासह घरात होते. मात्र सुदैवाने त्यांना आंदोलकांच्या तावडीतून निसटण्यात यश आलं. त्यांनी आता बांगलादेशमधील एका अज्ञातस्थळी आश्रय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे.
बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना यांनी सध्या भारतात तात्पुरता आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे.
बांगला देशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार गुरुवारी स्थापन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकाराचा शपथविधी गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान पार पडणार असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

error: Content is protected !!