ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

प्रतिभा इंडस्ट्रीजने कामाची व्याप्ती व भाववाढ कारणे देत पालिकेकडे वाढीव रकमेची मागणी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


नवी मुंबई : ठाणे  जिल्हा न्यायालयात (Thane District Court) ठेवण्यात आलेली निवाड्याची रक्कम काढण्यासाठी नवी मुंबई (Navi Mumbai) पालिकेला (Municipal) प्रतिबंध करावा, या मागणीसाठी प्रतिभा इंडस्ट्रीजच्या (Pratibha Industries) वतीने करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयाने(Thane District Court) व्याजासह २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला (Municipal) सुपूर्द केला.
त्यामुळे कंत्राट करारनाम्यातील लवाद नेमण्याच्या तरतुदीचा उपयोग करून देयक रक्कम फुगवून ती रक्कम पालिकेकडून वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदारांना यामुळे चाप बसला आहे.पालिका क्षेत्रातील जलवाहिन्या टाकण्याचे काम करणारे कंत्राटदार प्रतिभा इंडस्ट्रीजने कामाची व्याप्ती व भाववाढ अशी काही कारणे देत पालिकेकडे वाढीव रकमेची मागणी केली होती.
आयुक्तांमार्फत त्रयस्थ लवादाची नेमणूक करून त्यांच्यापुढे याबाबतची सुनावणी झाली. सुनावणीअंती लवादामार्फत पारित आदेश प्रतिभा इंडस्ट्रीजच्या बाजूने देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना विशिष्ट रक्कम देण्याचे निवाड्यात नमूद करण्यात आले होते. या निवाड्याला नवी मुंबई पालिकेने ठाणे जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.

error: Content is protected !!