ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला


मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित चीपि विमानतळाच्या उद्घाटन समारंभ वरून आता शिवसेना व राणे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत असे विधान राणेंनी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यामुळे उद्घाटन समारंभात राडा होण्याची शक्यता आहे
कोकणच्या सर्वांगीण विकासा साठी कोकणात विमानतळ होणे आवश्यक होते त्यानुसार कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील चिपि येथे विमानतळ बांधण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला २८६हेक्टर जमिनीवर ५२० कोटी रुपये खर्च करून हा विमानतळ बांधण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण केला आहेत आय आर बी सिद्ध दुर्ग ऐअर पोर्ट प्रा.ली.यांना विमानतळ उभारणी फायनान्स तसेच ओप्रेशन्स (डी बी एफ ओ)साठी लिजवर हे काम देण्यात आले होते त्यांनी हा खर्च केला विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणारा पाण्याचा पुरवठा,रस्ते विकास आरक्षण भिंत ही कामे एम आय डी सी क्या माध्यमातून झाली त्यासाठी १४कोटींचा खर्च झाला आता ९ ऑक्टोबरला या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ,आणि मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे उद्घाघाटन पार पडणार आहे आणि त्याला नारायण राणे सुधा हजार राहणार आहेत .मात्र आता उद्घाटन समारभावरून शीयवडाची लढाई सुरू झाली आहे . भाजप आणि राणे यांच्या म्हण्या नुसार राणे मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला तर शिवसेना मात्र राणेंना याचे श्रेय द्यायला तयार नाही त्यामुळे आता दोघनांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झालाय आणि या वादातून राडेबाजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

error: Content is protected !!