रे रोड सेक्स स्कँडल एक मोठे रॅकेट ! सीआयडी कडे तपास द्यावा .
मुंबई/ रे रोड, दारुखानाहा संपूर्ण परिसर सध्या गटार साफ करणारे परप्रांतीय नागरिकांनी धुमाकूळ घातला आहे . तिथे पूर्वी पासून दारू पासून अमली पदार्थ पर्यंत नशेचा कारभार चालतो . पोलीस आणि पालिका , बीपीटी असूनही त्यांनी डोळेझाक केली त्यामुळे येथे भयंकर सेक्स स्कँडल सुरू आहे . काही गटार साफ करणाऱ्यानी इथल्या झोपडपटी वस्ती मधील झोपडपट्टीत चक्क छुपे कॅमेरे बसवून झोपडपट्टीतील लोकांच्या खाजगी संबंधाचे, स्त्रियांच्या अंगघोळीचे चित्रीकरण केले . त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांच्यात गटार साफ मध्ये झालेल्या भांडणामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे व 140 अश्लील क्लिप सह तिघांना अटक करण्यात आली आहे . यामध्ये तीन आरोपींना अटक केले आहे परंतु याचा नराधम मास्टर माईंड आरोपी अद्याप मोकाट असल्याचे कळते . हे गुन्हेगार तरुण वयोगटातील आहे .शिवडी पोलीस ठाणे यांचा शोध घेत आहे . सदर प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सीआयडी कडे सोपवणे गरजेचे असल्याचे मत जनतेने व्यक्त केले .
बिपीटी अधिकाऱ्यांची जबाबदारी झटकून चालेल कसे ? बीपीटी मंडळ करते काय ? -ही सर्व जागा बिपीटी अधिपत्त्यातील आहे .पण बीपीटी चा अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा त्यांनी हप्तेखोरी केल्याने गटार साफ करणारी टोळी कित्येक वर्षापासून येथे काम करत आहे . यां चे कामकाज काय करते व यावर देखरेख ठेवण्याचे काम बीपीटी अधिकाऱ्यांचे नव्हते का ? या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे
बी पी टी मध्ये अनेक भूखंडावर इथल्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणं करून अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत , बेकायदा इमारती उभ्या राहिल्या त्यावर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता आमच्या भूखंडावर आपण कारवाई कसे करतात असे मुद्दे मांडून एक प्रकारे येथील बेकायदा संरक्षण देण्याचे काम काही अधिकारी करत असल्यामुळे प्रकरणी अधिकाऱ्यांवर सुधा कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे .