ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेना- शिंदे गट न्यायालयीन लढाईचा फैसला लांबणीवर


दिल्ली / शिवसेनेतील 16 फुटीर पात्र की अपात्र तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार यावर आता सर्वोच्च न्यायालय 27 सप्टेंबरला निकाल देणार आहे मात्र या प्रकरणावर गेल्या 2 महिन्यापासून तारीख पे तारीख पडत असल्याने शिंदे गटाचे मंत्री मागे जे म्हणाले होते की कोर्टाचा निर्णय यायला 5 वर्ष लागतील ते खरेच की काय असा आता लोकांना संशय यायला लागलाय .
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सत्ता संघर्षाची न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आणि या प्रकरणी दोन्ही कडच्या एकूण 6 याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यात शिवसेना मधून फुटलेल्या 16 आमदार अपात्र तसेच धनुष्यबाण कोणाचे हे दोन प्रमुख मुद्दे आहेत.दरम्यान शिंदे गटाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे आणि याबाबत मंगळवारी शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यात म्हटले होते की धनुषबान हे चिन्ह आपल्याला मिळावे मात्र त्याला शिवसेनेने आक्षेप घेतला आणि निवडणूक चिन्ह बाबत कोणताही निर्णय घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे अशी मागणी केली .त्यावर काल सुनावणी झाली आणि न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण घेतले तसेच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्ष चिन्हं बाबत निर्णय न घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत का अशी विचारणा केली.काल दोन्ही पक्षांची भूमिका एकूण घेतल्या नंतर याबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होईल तोवर निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत .

error: Content is protected !!