ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठा आरक्षण! राज्य सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेबरला निकाल ?


मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज गेली अनेक वर्ष ज्या मराठा आरक्षणासाठी लढतोय त्यावरचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर राज्य सरकारने जी पुनर्विचार . सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीचा वेळ जवळ आला आहे. येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्ट संबंधित याचिकेवर मोठा निकाल देणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा संबंधित निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालात राज्यातील मराठा समाजाला दिलासा मिळतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा निकाल सकारात्मक राहिला तर महायुती सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी मिळालेलं मोठं गिफ्ट ठरणार आहे. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
“मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्यावतीने आणि राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. पण न्याय अद्याप मिळालेला नाही. सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल. सरकारने प्रचत्न केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल. कारण त्यांना कल्पना आहे, माहिती आहे की, न्यायालयात कधीकधी कशाप्रकारे जावं लागतं. त्यांनी ते करावं, अशी अपेक्षा मला आणि समाजाला आहे”, असं विनोद पाटील म्हणाले.

error: Content is protected !!