ड्रग माफीयांचा कर्दनकाळ
ड्रग्स सप्लायर बाबतचा लढा कठीण आहे, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत. मात्र आमचे कर्तव्य आहे ते करणार आहोत. बॉलिवूड कनेक्शनबाबत एनडीपीएस ऍक्टचे उल्लंघन करणारे त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, नुकतेच मुंबईत क्रुझवरील रेव्ह पार्टी मध्ये थेट बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलाला आर्यनला अटक केली आहे. याच बरोबर आतापर्यंत या प्रकरणात 17 जणांना अटक समीर वानखेडे यांच्या टीमने केली आहे .
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील. ते आधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त होते. त्यानंतर त्यांनी बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत देखील काम केलं. आतापर्यंत त्यांनी 2 हजारहून अधिक लोकांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 17 हजार कोटींहून अधिक रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे.