डेक्कन एडुकेशन सोसायटी (डीईएस) मुंबई कॅम्पस व एनआयपीएम मुंबई चॅप्टर त्याच्या संयुक्त विद्यमाने- शिखर सम्मेलन- शनिवार, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी, सकाळी १०. ३० वाजता.
चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी. एचआर शिखर परिषदेतील एकदिवसीय पॉवरपॅक सत्र. एच आर प्रोफेशन साठी एक अद्ववतीय संधी असेल. विचार करायला प्रवत्तृ करणारे विषय, दोन पॅनलमधील विचारांची देवाण घेवाण ,एच आर सोबत नेटवर्क या कॅम्पस इव्हेंटमधील काही ठळक मुद्दे असतील.
डीईएस मुंबई कॅम्पसची ६७ वर्षांची परंपरा आहे. संस्थेच्या मुबई कार्यक्षेत्रात तीन संस्था आहेत – कीर्ती एम दुंगुर्सी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय जे मुंबई विद्यापीठाशी संलग्न एक पदवीधर महाविद्यालय आहे. नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट जे मुंबई विद्यापीठाचे MCA एमसीए(मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) आणि MMS एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) देणारी पदव्युत्तर संस्था आहे. जयश्री कोठारी बिझनेस स्कूल जी AICTE शी संलग्न एक स्वायत्त संस्था आहे जी PGDM (डेटा अनॅलिटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर लक्ष केंद्रित करून व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हा अभ्यासक्रम शिकविला जातो. एनआयपीएम मुंबई चॅप्टरच्या सहयोगाने डीईएस कॅम्पस या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


औदयोगिक क्रांती ४. ० मध्ये मानवी भांडवलाचा वापर करण्याचा नवीन मंत्र
मानव संसाधन शिखर सम्मेलन HR Summit 4.0–आभासी (व्हर्चुअल) कार्य करने , डिजिटल पद्धतीने सुरक्षित कार्यस्थळ तयार करने, उद्योगांना अधिक कार्यशील बनवने
या साथीच्या काळात तंत्रज्ञानामुळे मानवी संबंध अधिक दृढ झाले आहेत. या संकटामुळे प्रत्यक्षात व्यवस्थापनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला गती आलेली आहे. आज कार्यस्थळांची पर्वा न करता उत्पादक आणि गुंतलेले आहेत. आज आभासी (व्हर्चुअल ) मनुष्यबळामुळे ते सुरक्षितपणे एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा योग्य माहिती आणि संसाधनांमध्ये प्रवेश करू शकतात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या आणि घरच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या गरजा मोजण्यासाठी आणि कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी साधनांचा विचार करण्याची काळाची गरज आहे.
खालील दोन विषयांवर एचआर शिखर पररषदेत चर्चासत्र होईल:
१. विविधता आणि सर्वसमावेशकता याची नवी परिमाणं
२. आभासी (व्हर्चुअल )मनुष्यबळ आणि सायबर सुरक्षा
यू ट्यूब लिंक: https://www.youtube.com/channel/UCCNlCSDXBqKGF7hWOQBmAmg