ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं – श्रीमती शालिनीताई पाटील

मुंबई : उपमुख्यमंत्री  अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय.

जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे. आयकर विभागानं माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे. दे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अजितदादांवर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत. न्यायालयात माझी लढाई सुरुच आहे. साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळणार, असंही शालिनी पाटील यांनी म्हटलंय.

साखर कारखाना लिलावात काढायची गरज नव्हती. कारखाना बुडीत नव्हता. आठ कोटीच्या ठेवी होत्या. त्यातून तीन कोटीची रक्कम फेडता आली असती. यांना कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी आता केंद्र सरकारनं आणि निवडणूक आयोगानं बंदी घातली पाहिजे, असंही पाटील म्हणाल्या.

जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी संबंध काय?
अजित पवार यांनी तुरुगांत असलेल्या जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी काय संबंध आहेत हे स्पष्ट करावं. गुरु कमोडिटी यांना कारखाना खरेदीसाठी कुणी मदत केली? ओमकार बिल्डरला पैसे कुणी दिले? जरंडेश्वर कारखाना 40 वर्षासाठी लिजवर दिला. अजित पवार आणि शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं. घोटाळा लपवण्यासाठी वेगळी दिशा दिली जात आहे.

error: Content is protected !!