ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

आर्यन खानला जामिन नाकारला

मुंबई: मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खान याच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज कराला लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणारआहे.

मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केले होते. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली.

error: Content is protected !!