ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आजच सर्व पुरावे सादर कण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश- शिवसेनेचे टेन्शन वाढले

मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात निवडणूक चीन्हा वरून सुरू असलेल्या वादावर आज निर्णय होऊ शकला नाही मात्र शिंदे गटाने सर्व पुरावे सादर केल्यामुळे शिवसेनेने शनिवार पर्यंत म्हणजे आजच सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.
शिवसेनेच्या चिन्हावर शिंदे गटाने अधिकार सांगितल्यामुळे हे प्रकरण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे .मात्र पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेने जो वेळ मागितला होता तो वेळ निवडणूक आयोग द्यायला तयार नाही . आज निवडणूक आयोगाने शिवसेनेला पत्र पाठवून शनिवार पर्यंत सर्व पुरावे सादर करा अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे शिवसेना नेते अनिल देसाई आपल्या वकीला सह दिल्लीला रवाना झाले .पण तत्पूर्वी शिंदे गटाच्या वकिलाने आमच्याकडे 7 लाख सदस्य असल्याचा पुरावा सादर केला आहे .तसेच 40 आमदार 12 खासदार आणि 144 पदाधिकारी असल्याचे पुरावे या पूर्वीच दिलेत त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार असे दिसत आहे . त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढल्ले आहे

error: Content is protected !!