टॅक्सी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठ्या कटाचा पर्दाफाश अंबाणीचे अटनिया पुन्हा टार्गेटवर!
मुंबई/ भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अटनिया या आलिशान बंगल्यास पुन्हा एकदा टारगेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र एका टॅक्सी ड्रायव्हर मुले त्या दोन अज्ञात इस्मांची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत नाकाबंदी केली तसेच अंटालीया परिसरात कडेकोट बंदोबस्त लावल्याने पुढील अनर्थ टळला आहे .
काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या अन्टालिया बंगल्या जवळ जिलेटीन चां काड्या असलेली एक कार उभी करून ठेवण्यात आली होती त्यावरून मोठे महाभारत घडले होते त्याचवप्रकरणा मध्ये सचिन वझे याला अटक झाली त्याच प्रकरणात मनसुख हिरेन नावाच्या एका इस्माची हत्या झाली त्या प्रकरणाचा अजूनही तपास पूर्ण झालेला नसताना पुन्हा एकदा अंतलीयला टार्गेट करण्यात आलेय .
आज दुपारी एक वागेणार कार किल्ला कोर्टा जवळून जात असताना कार मधील इसमाने एका टॅक्सी ड्रायव्हरला मुकेश अंबानींच्या अन्टालिया बंगल्याचा पत्ता विचारला त्यामुळे त्या टॅक्सी ड्रायव्हरला संशय आला आणि त्याने ही माहिती पोलिसांना कळवली . त्यानंतर वेगाने तपासाची सूत्रे हलली पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला बोलून त्याची चौकशी केली तेंव्हा त्याने त्या करचा नंबर दिला तसेच त्या दोन इसमाच्या हातात दोन बॅगा होत्या आणि ते उर्दूत बोलत होते अशी माहिती दिली त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हालचाल करून त्या दोन अज्ञात इसमांनी पकडण्यासाठी संपूर्ण मुंबईत नाकाबंदी केली .तसेच अंतलिया बंगल्याची सुरक्षा वाढवली दरम्यान या गोष्टीमुळे मुंबईत आणि खास करून व्यापारी वर्गात मोठी खळबळ माजली आहे .