ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भिखार ..! अब्दुल सत्तरच्या राजीनाम्याची मागणी

सिल्लोड/ शिंदे शिवसेना पक्षातील फुटीर आमदार आणि सध्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द म्हणताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादीने काल संपूर्ण महाराष्ट्रात सत्तार याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले .त्याच्या फोटोला जोडे मारून त्याचे पुतळे जाळले तसेच त्याच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील बंगल्यावर तुफान दगडफेक करून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली .त्यामुळे सत्तार याला त्याना चांगलीच महागात पडणार आहे . राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे .
सतार याना 50 खोके मिळाले असे बोलले जाते त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना खोके मिळाले म्हणून ते गप्प आहेत असे म्हटले होते . त्यांच्या या विधानाचा सत्तारणा मिरच्या झोबल्या त्यामुळे त्यांनी सुप्रियाताईंना अपशब्द म्हटले पण आता चहूकडून त्यांच्यावर जोडे पडत असल्याने मुख्यमंत्री शिंदे हे सुधा नाराज झालेत शिवाय भाजपची पहिल्यापासून सतारवर नाराजी आहे त्यामुळे सतारची मंत्रिमंडळातून हकालपट्टी निश्चित आहे .

error: Content is protected !!