निवडणूक लाढवा नाही तर पाडापाडी करा – पण मराठ्यांना आरक्षण कसे देणार ते सांगा ! राज ठाकरेंचा जरांगेनं सवाल
लातूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या भूमिकवर भाष्य केले आहे. मनोज जरांगेंना निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडापाडी करायची असेल, तर ती करा. पण, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कसे आहात, येवढे मला फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. राज ठाकरे आज लातूरमधील रेणापूर येथे जाहीर सभेत बोलत होते.
मनोज जरांगे यांनी सुरुवातील निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर त्यांनी समाजबांधव आणि इतरांशी चर्चा झाल्यानंतर निवडणूक लढवणार नसून उमेदवार पाडणार असल्याचे भूमिका जाहीर केली. मनोज जरांगे यांच्या याच भूमिकेवर राज ठाकरे यांनी भाष्य केले आ
राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले. त्यानंतर विधानसभा निवडणुका लढवण्याचे त्यांनी जाहीर केले. मग काही दिवसांनी निवडणूक लढवणार नाही, पाडापाडी करणार, अशी भूमिका घेतली. तुम्हाला निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडायचे असेल तर पाडा, पण प्रश्न इतकाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, येवढे मला फक्त सांगा…असे राज ठाकरे म्हणाल
मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार. ते देऊ शकत नाही. कोणतेच राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही. जी गोष्ट घडू शकत नाहीत. भेटू शकत नाहीत, त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत, असेही राज ठाकरेंनी सांगितले.