लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून सी डी एस बिपिन रावत यांच्यासह १४ शहीद- अपघात की घातपात?
कुंनुर( तामिळनाडू)/ खराब वातावरणात हेलिकॉप्टर चां प्रवास किती धोकादायक असतो याची पुन्हा एकदा प्र्च्र््र्च्र्र्च्र्््र्च्र््र्च्र्र्च प्रचिती आली आली काही वर्षांपूर्वी आंद्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉफ्टरला डोंगराळ भागात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.काल तशीच भयंकर दुर्घटना तामिळनाडूतील निलगिरी पर्वत परिसरातील डोंगराळ भागातील जंगलात घडला लष्कराचे एक हेलिकॉप्टर कुंनुरच्या जंगलात कोसळून त्यात लष्कराचे चीफ डिफेन्स स्टाफ प्रमुख बिपिन रावत त्यांची पत्नी माधुरीला यांच्यासह १४ जन शहीद झाले
बिपिन रावत हे लष्कराच्या एम आय १७ व्हीं ५ या हेलिकॉप्टरने लष्कराच्या वेलिंग्टन येथील महाविद्यालयात लेक्चर साठी जात होते .सोबत त्यांची पत्नी आणि काही लष्करी अधिकारी सुधा होते . कोइंबतूर / सुल्लुर दरम्यानच्या जंगलात कूंनुर जिल्ह्यात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्याचा स्फोट झाला आणि त्यात असलेले सर्वजण गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण कुणीही वाचू शकले नाहीत या भीषण अपघातात सीडी एस बिपिन रावत त्यांची पत्नी मध्युरिका,ब्रिगेडियर एल एल लीडर, लेफ्टनंट कर्नल रणजित सिंग,लांस नायक गुरू सेवक सिंग,जितेंद्र कुमार,विवेक कुमार,बी सैतेजा,हवलदर सतपाल आदी १४जन शहीद झाले दरम्यान हा अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात असून चौकशीचे आदेश देण्यात आलेत .या घटनेनंतर जनरल नरवणे यांनी आरक्षण मंत्र्यांना सर्व माहिती दिली तर पंतप्रधानांनी सी जी एस ची बैठक घेऊन सर्व माहिती घेतली आज राजनाथ सिंग संसदेत याबाबतचे निवेदन करून सर्व माहिती सांगणार आहेत