पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल
मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात ३ मार्च तर सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी मतदान होईल मणिपूर मध्ये २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी मतदान होईल तर उत्रखंड,गोवा आणि पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल या निवडणुकीसाठी २लाख,१५ हजार ३६८ मतदान केंद्रे आहेत तसेच कोरोनामुळे रोड शो बाईक रॅली,मिरवणुका यावर बंदी असेल या निवडणुकीत १८ कोटी ३० लाख मतदार मतदान करणार आहेत