ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इंडिया आघाडीत कॉंग्रेस एकाकी पडली ! दिल्लीत पराभव अटळ


नवी दिल्ली – इंडिया आघाडी मध्ये त कॉंग्रे एकाकी पडत चालली आहे. ममता,केजरीवाल , अखिलेश आणि आता उद्धव थाक्रही कॉंग्रेसवर नारज असल्याचे समजते. दिल्लीतील निवडणुकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचा आपला पाठिंबा असल्याने कॉंग्रेस उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत
दिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे. तिरंगी लढतीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे. तर मतविभाजनाचा फायदा आपल्याला होईल, या आशेवर भाजप आहे. पण सद्यस्थितीत दिल्लीत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. एवढेच नाही तर इंडिया आघाडीतील एकही पक्ष काँग्रेसच्या बाजूने उभे राहायला तयार नाही.
आघाडी ही केवळ लोकसभेपुरतीच होती, असा दावा आघाडीतील सर्वच मित्रपक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र होते. पण दिल्लीमध्ये मात्र काँग्रेससोबत कुणीच नाही. त्याला काँग्रेसचेच आत्मघातकी धोरण कारणीभूत ठरल्याचे दिसते.
हरियानातील निवडणुकीदरम्यान आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेही त्यासाठी आग्रही होते. पण राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यात मिठाचा खडा पडला. विधानसभेचा निकाल आल्यानंतर काँग्रेसने आघाडी न करण्याची मोठी चूक केल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच वचपा आपने दिल्लीत काढला. हरियाणामध्ये आघाडी झाली असती आणि सत्ता मिळाली असती तर कदाचित दिल्लीतही चित्र वेगळे निर्माण झाले असते.आपने हरियाणाचे सुत्र दिल्लीत लागू करत काँग्रेसला काही जागा सोडण्याची तयारीही दाखवली असती. काँग्रेसचा दिल्लीत एकही आमदार नाही. त्यामुळे आपच्या साथीने राज्यात खाते उघडण्याची संधी पक्षाला मिळाली असती. पण तसे घडले नाही. हरियाणामध्ये पक्षाला अतिआत्मविश्वास नडला. त्याचे परिणाम आता पुढील अनेक निवडणुकांमध्ये भोगावे लागणार, हे स्पष्ट आहे

error: Content is protected !!