अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून – मोरीस भाई याची आत्महत्या
मुंबई : ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचं पुत्र आणि मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरून तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागल्यामुळे अभिषेकचा मृत्यू झाला तर गोळ्या
झाडणाऱ्याने शेवटी स्वतःवरही ४ गोळ्या झाडून आत्महत्या केली.
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, पण ते मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरून वाद संपवत असल्याचे जाहीर केले.
पण पुढच्याच क्षणी मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर समोरून गोळीबार केला. त्यांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या या घोसाळकरांच्या शरिरात घुसल्या. एक गोळी घोसाळकरांच्या डोक्यात घुसली. एवढं झाल्यानंतर मॉरिनने स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि संपवलं. मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी झा़डून घेतली.
मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.
