ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आरोप भयंकर पण संशयास्पद!

भाजपला सतेमधे येण्याची खूपच घाई झालेली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकार कोसळण्याच्या तारखा दिल्या जात होत्या पण आता लोकांचा विरोधी पक्षांच्या तरखांवर विश्वासाचं राहिलेला नाही.त्यामुळे आता काही 5 वर्ष हे सरकार पडणार नाही याची खात्री भाजपच्या नेत्यांना पटली आहे त्यामुळे आत तारखा देण्याचे प्रकार थांबले असून आता बदनामीची मोहीम सुरू झाली आहे त्यासाठी किरीट सोमय्या आणि ई डी हातात हात घालून काम करीत आहेत आता पर्यंत आघाडीतल्या दोन मंत्र्यांना गजाआड करण्यात विरोधकांना यश आले आहे .पण दोन वर्षात फक्त दोन मंत्री आत गेले हा वेग काही बरोबर नाही त्यामुळे सरकार पडण्याच्या मोहिमेला आणखी यश येण्यासाठी चक्क स्टिंग ऑपरेशनची नवी मोहीम सुरू करण्यात आली त्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या केस मध्ये अडकविण्यासाठी प्रकारे अडकवण्याचा डाव होता याच्या व्हिडिओच विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे
एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आरोप करीत आहेत की केंद्र सरकारं आमच्या विरुद्ध तपास यंत्रणांच्या गैरवापर करीत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते सांगत आहेत की राज्य सरकार आमच्या विरुद्ध तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत आता खरे कोण बोलतोय आणि खोटे कोण बोलतोय ते परमेश्वराला ठाऊक पण जे काही चाललेलं आहे ते महाराष्ट्राच्या इभ्रतीला आणि उज्वल परंपरेला डाग लावणार आहे .यात एक गोष्ट खरी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही लबाड आहेत आणि ते जनतेला अक्षरशः मूर्ख बनवीत आहेत.आम्ही मागेच म्हटल होत भाजपला आता जे शिवसेनेचे घोटाळे बाहेर काढीत आहेत ते त्यावेळेला सेना भाजपा सतेत असताना त्यांचे सरकार असताना का नाही बाहेर काढले तेंव्हा सेनेच्या घोटाळ्यावर भाजपने आणि भाजपच्या घोटाळ्यावर सेनेने पांघरून घातले कारण र्यावेळा दोघांचाही मिल बाटके खाओ हा एक कलमी कार्यक्रम सुरू होता आणि आता त्यांची युती तुटल्यावर एकमेकांचे कपडे फडात आहेत.

एकमेकांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सेना भाजप वाल्यांवर गुन्हे दाखल करून त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर जे आरोप केलेत त्याची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते पण न्यायपालिका गप्प का ? तेच कळत नाही अशाने लोकांचा न्याय पालिकेवर सुधा विश्वास बसणार नाही आणि कसा बसेल कारण काल फडणवीस यांनी भर विधानसभेत सांगितले आहे की महाजन प्रकरणात एक वकिलाने न्यायमूर्ती साहेबाना 50 लाखात मेनेज करता येते तसे असेल तर मग लोकांनी विश्वास तरी कसा ठेवावा बरे फडणवीस यांनी 125 तासांची रेकॉर्डिंग असलेले स्टिंग ऑपरेशन उघडकीस आणले आहे पण एवढी रेकॉर्डिंग शक्य नाही असे शरद पवार आणि काही सायबर तज्ञांचे सुधा म्हणणे आहे त्यामुळे फडणवीस यांनी ज्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ चां पेन ड्राईव्ह सभापतींना दिलाय त्याच्या सत्तेवर च आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातेय.गिरीश महाजन हे काही फार मोठे नेते नाही भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवायचे आणि म्हणूनच त्यांच्या स्टिंग पोरेशांवर महाराष्ट्राचा विश्वास नाही तरीही या प्रकरणातील सत्यता महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवी म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी

error: Content is protected !!