ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

औरंगजेबाची कबर हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत


मुंबई/छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या चित्रपटात औरंगजेबाने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ करून त्याना मारले त्याचा नामो निशाणा महाराष्ट्रात नको औरंगजेबाची कबर ही तात्काळ हटवा अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनाने केली आहे. या मागणीवर औरंगजेबाची कबर हटवण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत
गुरु तेग बहादुर यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की औरंगजेबाची कबर हे राष्ट्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे. परिणामी त्याला कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून ही कबर हटवली जाईल किंवा त्यात बदल केला जाईल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भगर येथे औरंगजेबाची कबर आहे ही कबर हटवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती परंतु ती पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने तिला संरक्षण आहे आता मात्र औरंगजेबाची ही कबर तात्काळ हटवा अशी मागणी जोर धरू लागली आहे तसेच या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरू लागले आहे त्यामुळे सरकार ही कबर हटवण्याचा प्रयत्न असल्याचे समजते मात्र ही कबर हटवताना सर्व कायदेशीर बाबींचा भेट अभ्यास करूनच ही कबर हटवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले

error: Content is protected !!