सदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२ पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई- दि. ०८/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत *सिल्वर ओक या निवासस्थानी एस.टी.कर्मचारी यांनी आक्रमक आंदोलन केले होते, त्या अनुषंघाने सदर *१०९ (२४महिला) आंदोलकर्ते तसेच त्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गांवदेवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र १३२/२२, कलम-१४२,१४३,१४५,१४७,१४९,३५३,३३२,३३३,४४८,४५२,१०७ (ब) सह कलम- ७ Criminal Law Amendment Act सह कलम- ३७/१३५ महाराष्ट्र पोलीस कायदा या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
वर नमूद सर्व आरोपी यांना आज दि.०९/०४/२०२२ रोजी मा. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालय न्यायमूर्ती श्री. सावंत कोर्ट क्र.१९ (किल्ला कोर्ट) येथे रिमांड कामी आणण्यात आले होते. परंतु कोर्ट रूम मधील अपुऱ्या जागेमुळे त्यापैकी फक्त आरोपी गुणरत्न सदावर्ते यांना क्र.१९ मध्ये रिमांड कामी हजर करण्यात आले होते आणि इतर १०९ आरोपी यांना कोर्ट क्र.१९ च्या बाहेर उभे करण्यात आले होते.
सदर सुनावणी दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने ऍड श्री.महेश वासवानी तर सरकारी पक्षाच्या बाजूने ऍड.श्री.प्रदीप घरत तसेच इतर १०९ आरोपी यांचे वकील ऍड श्री. गायकवाड या सर्वांनी आपआपली बाजू मांडली.
तिन्ही पक्षांची बाजू ऐकून झाल्यानंतर मा. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालय न्यायमूर्ती श्री. सावंत कोर्ट क्र.१९ (किल्ला कोर्ट) यांनी गुन्ह्यातील *अटक आरोपी क्र.०१ सदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी तसेच इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर सुनावणी बाबत माहिती घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात मीडियाचे प्रतिनिधी कोर्ट कंपाऊंडच्या बाहेर कॅमेरे सह उपस्थित होते.