घटका भरली! १६ आमदारांच्या अपात्र ते बाबत विधानसभा अध्यक्ष कडून हालचाली सुरू
मुंबई/ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले होते. त्याबाबतच्या कारवाईला आता सुरुवात झाली असून शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 13 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्ष कडून एकनाथ शिंदेंसह १६आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ याना केली होती त्यानुसार या आमदारांना अपात्र करण्यात आले पण झिरवाळ यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षकवर सोपवला आणि ९० दिवसांच्या आत निर्णय घ्यायला सांगितले त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कार्यवाहील सुरुवात केली आहे.