ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दिवंगत विजयसिंह पाटणकर यांची शोकसभा

मुंबई — सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपून अनेकांना मदत करणारे, मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त विजयसिह लालासाहेब पाटणकर यांचे दोन जुलै 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची शोकसभा 21 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता एसएनडीटी कॉलेज हॉल, रफी अहमद किडवाई मार्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.

आमच्या मुंबई जनसत्ता वृत्तपत्राशी त्यांचे पूर्वीपासून खूप घनिष्ठ संबंध होते. मुंबई जनसत्ताच्या संघर्षाच्या काळात त्यांनी खूप सहकार्य केले. मुंबई जनसत्तानेही पाटणकर यांच्या पालिकेतील कार्याचा वेळोवेळी आढावा घेऊन ,लोकांसमोर मांडला. अशा एका चांगल्या आणि निवृत्त पालिका अधिकाऱ्याला मुंबई जनसत्ताची भावपूर्ण श्रद्धांजली!!

error: Content is protected !!