राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही पायाखाली घेऊ- शिवसेना खासदाराच्या विधानाने राष्ट्रवादी संतप्त
आघाडीत पुन्हा बिघडी
मुंबई/ महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा गेले सव्वा वर्ष कशी बशी धक्के खात पुढे चाललीय.पण तिचा पाच वर्षांचा प्रवास पूर्ण होईल असे वाटत नाही कारण आघाडीतील तिन्ही पक्षात समन्वय नाही सुरवातीला काँग्रेस नाराज होती आता राष्ट्रवादीने शिवसेना विरुद्ध दंड थोपटले आहेत.कारण परभणीत शिवसेना खासदाराच्या स्फोटक विधानाने वादाची ठिणगी पडल्याने आघाडीत पुन्हा एकदा बीघडी निर्माण झाली आहे.
परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सेनेचे खासदार बंडू जाधव आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद होता बंडू जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जिल्हाधिकारी नियुक्ती बाबत काही सूचना केल्या होत्या .पण त्याला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही मात्र यामागे छगन भुजबळ आहेत असा बंदी जाधव यांना संशय होता त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांची जीभ घसरली आणि आमच्या नादाला लागू नका आम्ही राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ असा इशारा दिला त्यांच्या या इशार्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चिडले असून बंडू जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी करीत आहेत तर शिवसेनेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या करकर्त्यांमध्ये सध्या तणाव असून राज्याच्या इतर जिल्ह्यात सुधा वादाची प्रतिक्रिया उमटू शकते असे दिसतेय .आता या बाबत पक्षाचे नेते शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
निवडणुकीत सर्व जिल्ह्यांमध्ये महा विकास आघाडी एकत्र लढणार नाही/नवाब मलिक
राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महा विकास आघाडीचे सरकार असेल तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरसकट आघाडी केली जाणार नाही प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील वातावरण पाहूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विषयाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले