ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

२० लाखांच्या लाच प्रकरणी ईडीच्या उपकसंचलकला अटक


नवी दिल्ली /दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या आणि सत्ताधाराने इशारा केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना टार्गेट करणाऱ्या ईडीचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेल्या आहे कारण दुसऱ्याच्या लाच खोलीचा पंचनामा करणाऱ्या इडीच्या एका सहाय्यक संचालकांना चक्क वीस लाखांच्या लाख प्रकरणी अटक करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय आणि ईडीच्या कारवाईसंदर्भात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. मात्र, आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने ईडीच्या सहाय्यक संचालकालाच लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या सहाय्यक संचालकाला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली. संदीप सिंह यादव असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील लाजपत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. मात्र, ईडीचा सहाय्यक संचालकच लाच घेताना पकडल्यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!